एक डेट

एक डेट

रूपा एका रेस्टॉरंटमध्ये डेटवर आहे.
Rupaहाय! कसा आहेस?
Milanछान!
Milanतुला काय खायचं आहे?
Rupaएक सॅलड.
Rupaआज माझी एक महत्त्वाची मॅच आहे.
Milanअरे, तुला खेळ आवडतात का?
Rupaहो, मी फुटबॉल खेळते.
Milanमी सुद्धा
Rupaमस्त!
Rupaतू कुठून आहेस?
Milanमी अमेरिकन आहे.
Milanमाझे वडील क्युबाहून आहेत आणि माझी आई मॅक्सिकोहून आहे.
Rupaमला क्यूबा खूप आवडतं
Milanक्यूबा खूप सुंदर आहे.
Rupaतुझ्याकडे पाळीव प्राणी आहेत का?
Milanमाझ्याकडे दोन मांजरी आणि एक कुत्रा आहे.
Rupaमाझ्याकडे सुद्धा एक कुत्रा आहे, विक्रम.
Milanकाय? माझं नाव मिलन आहे.
Milanतू आकृती नाहीस का?
Rupaनाही!
Rupaमाझं नाव रूपा आहे!
एक स्त्री मिलन कडे चालत येते.
Aakrutiहाय! तू मिलन आहेस का? मी आकृती आहे.
Milanनाही, माफ करा. मी विक्रम आहे.