
खूप धोकादायक
मी करू शकत नाही, सायली.
हो, तू करू शकतेस, काळजी करू नकोस.
मला भीती वाटते! हे खूप धोकादायक आहे!
मला जायचं नाही!
नेहा… आपण ठीक असू.
आणि तुला कसं माहीत?
बरं, खूप लोक ते करतात.
नेहा… सगळं ठीक होईल.
मी तुझ्यासोबत आहे आणि आपण एकत्र जाऊ.
धन्यवाद, सायली. तू खूप चांगली मैत्रीण आहेस.
ठीक आहे.
मला वाटतं मी तयार आहे!
तू रोलर कोस्टर वर जाणार आहेस का नाई?
खूप लोकं वाट पाहत आहेत.
ही देशातील सर्वात उंच आणि जुनी रोलर कोस्टर आहे.
थांब… सर्वात उंच? आणि सर्वात जुनी?!
ठीक आहे, मी हे करणार आहे!
आणि माझी मैत्रीण सायली माझ्यासोबत येणार आहे!!
थांब… सायली, तू का पळतेस? कुठे जातेस?
माफ कर, नेहा! मला त्या रोलर कोस्टरवर बसायचं नाही!
हे खूप धोकादायक आहे!